मुसाफिर

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

अच्युत गोडबोले यांचे हे आत्मचरित्र अद्भुतरम्य आहे .कारण सोफ्टवेर च्या क्षेत्रातला हा माणूस विद्यार्थी दशेपासून अर्थ शास्त्र ,संगीत, साहित्य याचा अभ्यास करतो समाज कार्य करताना तुरुंगात हि जातो ,हे लोकविलक्षण आहे. साठी पार केल्यानंतर स्वताला ढवळून काढून अत्यंत तन्मयतेने घेतलेला हा एक स्वत बद्दलचा आढावा आहे. कुठल्याही वयाच्या,कुठल्याही क्षेत्राच्या वाचकास भुरळ पडेल असेच हे आत्मचरित्र आहे.


am-15मुसाफिर अच्युत गोडबोले मनोरमा प्रकाशन२५०रुपये ४६४ 

पानिपत

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

शेवटी अन्नान दश झालेली मराठी सेना झाडाची पाने आणि नदीकाठची शाडूची माती खून तरली ,कळी काळाला भिडली .पानिपतावर मराठे कसे लढले ,यासाठी दुसर्या कोण्या ऐर्या गैर्याची साक्ष काढण्याची गरज नाही . ज्याच्या विरुद्ध आम्ही जंग केला ,त्या आमच्या महशत्रुनेच पाच सात देशाच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशहा अब्दालीनेच लिहून ठेवले आहे ,मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती . युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले. मराठ्यांचा महापराक्रम पाहून कोणीही आश्चर्याने तोंडात बोटे घातली असती . मराठ्यांसारखी अशी युद्धाची लालसा ,अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे व दिसणे नाही.
पानिपत हि विश्वास पाटलांची मराठीतील एक अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे .आज पर्यंत त्याच्या तीस आवृत्या निघाल्या आहेत .am-11पानिपतविश्वास पाटीलराजहंस प्रकाशन३५० रुपये ६१० 

मिश्किल आणि मुश्किल

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

विसंगत -सुसंगतीच,एक हसरं कोलाज हरक्षणी आपल्या जगण्यात घडत असतं,मुश्किल वाटणारे क्षण हसर्या दृष्टीने मिश्किल होत आयुष्य बहारदार करत असतात . अशा मुशिलीतून मिश्कीलीकडे नेणाऱ्या स्मित रेषांचा हा मस्त नजराणा प्रवीण दवणे यांची वाचकांसाठी प्रसन्न भेट. खास विख्यात चित्रकार शी .द. फडणीस यांच्या मिश्किल मुखपृष्ठा सहित


am-09 मिश्किल आणि मुश्किल प्रवीण दवणेनवचैतन्य प्रकाशन १००रुपये९६

वोर्ड नंबर पाच ,के इ.एम

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

जवळपास चाळीस वर्ष शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर रवी बापट यांनी के.इ.एम मध्ये काम पहिले.या रुग्णालयात मिळालेले अनुभव, आणि अनेक तर्हेचे रुग्ण हाताळताना त्यांचे अनुभव विश्व आणि ज्ञान समृद्ध होत गेले.त्यांच्या कार्कीर्दीतील बराचसा काळ त्यांनी या पाच नंबर वार्डसाठीच खर्ची घातला आहे त्या वेळच्या रुग्णांच्या, सहकार्यांच्या, कर्मचार्यांच्या सार्या अनुभवांचे कथन फार नेटके पणानी डॉक्टरानी येथे केले आहे.


am-47 वोर्ड नंबर पाच ,के इ.एम रवी बापट रोहन प्रकाशन २५० रुपये ३०१ 

सत्तर दिवस

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

पंचे चाळीस खेळाडूना घेऊन जाणारे एक विमान अन्डीज पर्वतावर बर्फात कोसळते. विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न जारीने केला जातो पण हाती काहीच लागत नाही.दहा अठवद्या नंतर एक शेतकरी गुरे चारत असताना त्याला दोन माणसे भेटतात .....त्या दुर्दैवी अपघातातून वाचलेल्या सोळा लोकांनी त्यांच्या सत्तर दिवसांची सांगितलेली हृदयद्रावक सत्यकथा


am-69सत्तर दिवस रवींद्र गुर्जर श्रीराम बुक एजन्सी १२५ रुपये १८३ 

वाइज अंड आदरवाइज

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

सुधा मूर्ती यांनी भारताच्या मागास भागात खूप प्रवास केला.त्यांना विविध प्रकारची माणसे भेटली आणि त्यांचे आयुष समृद्ध करून गेली .एक प्रद्यापिका आणि समाजसेविका म्हणून त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्या पुढे मांडले आहेत.विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती ,मनमोकळ्या लेखन शैलीतून निर्माण झालेले हे पुस्तक सुधा मूर्ती ह्यांचे जीवनविषयक तत्व ज्ञान व्कार्या यांचे व्यापक दर्शन घडवणारे झाले आहे.


am-७१ वाइज अंड आदरवाइज सुधा मूर्ती /लीना सोहोनी मेहता पुब्लीशिंग हाउस १५० रुपये २०६ 

रारंगढांग

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

हिमालयात ज्या उंचीवर रस्ते बांधले गेले आहेत त्या उंचीवर जगात क्वचितच कुठे बांधले गेले असतील.ह्या रस्ता बांधणीतील सर्वात अवघड भाग हा उभ्या कड्यामधून रस्ता खोदून काढण्याचा. ह्या नितळ ,उभ्या कड्यांना, स्थानिक भाषेत ढांग म्हणतात.एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग,दुसर्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे .निसर्गात आणि माणसात जशी येथे रस्सीखेच व संघर्ष ,तसाच प्रसंगी माणसामाणसात ही आणि त्याचीच हि कथा


am-27रारंगढांगप्रभाकर पेंढारकर मौज प्रकाशन १२० रुपये १७५ 

उपरा

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

जे जगलं जे भोगलं,अनुभवलं,पाहिलं ते तसाच लिहित गेलो.पुन्हा एकदा तेच जगणं.जगात गेलो.पिढ्यान पिढ्या बिर्हाड पाठीवर घेऊन ,गाढवाचं जीणं जगणाऱ्या मंडळींच्या वेदना हे पुस्तक वाचून समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं.आपली आत्मकथा सांगताहेत लक्ष्मन माने .


am -32 उपरा लक्ष्मन माने ग्रंथाली १०० रुपये १५४ 

एका तेलीयाने

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

हा आजारी पडला ,तर अमेरिके ची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला तर ,अनेक देशात दिवाळी साजरी व्हायची .कित्येक राष्ट्र प्रमुख ,उद्योगपती याच्या कृपा प्रसादासाठी तासंतास तिष्ठत बसायला तयार असायचे. हा शेख अहमद झाकी यामानी. सौदी राजघराण्याशी संबंधित ,उच्च विद्याविभूषित तरुण. ओपेक ,ओआपेकसारख्या संघटनाचा पस्तीस वर्षाहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ञ.कार्लोस सारख्या कुप्रसिद्ध दहशतवाद्यालाही शह देऊ शकणारा तेलमंत्री .तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंग पालटवून टाकणारा एक अवलिया. त्याची ही कथा .डोळे दिपवणारी आणि अस्वस्थ करणारी.


am-31एका तेलीयाने गिरीश कुबेर राजहंस प्रकाशन २४०रुपये २४८ 

मनस्पर्श

Posted by KHANDBAHALE.COM / Category:

सुनेत्रा ओंक यांचा हा कथा संग्रह त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग ,अनुभव यातून या कथा साकार झाल्या आहेत .त्या म्हणतात माझ्या मनाला स्पर्श करणारी ज्या घटना मी लिहिल्या आहेत्त त्या तशाच क्रमाने घडलेल्या नाहीत . त्यामध्ये अनेक वर्षांची अंतरे आहेत.प्रत्यक्ष घटना घडल्या तेंव्हा त्यातील अर्थ जाणवला असेल किवा नसेलही ,पण मनात रुतून बसलेल्या त्यांना शब्दरूप देण्यावाचून मला गत्यंतर नव्हते अंतरात्मा कुठेतरी अस्वस्थ होता. कल्पनेची ती पाखरे आता मी मोकळी करत आहे .त्यांनी अवकाशात उडून जावे ,किवा दुसर्या पिंजर्यात शिरून बसावे . अनेक मराठी मासिकामधून हे लेख याआधी प्रसिद्ध झाले आहे त्या सार्यांचे संकलित स्वरूप वाचकांचा हातात देण्याचा हा प्रयत्न.

am 01मनस्पर्शसुनेत्रा ओंक अक्षता प्रकाशन १००रुपये ११२